6 वी नवोदय : अंकगणित - संख्या आणि संख्या पद्धती - स्वाध्याय 1.1

 

6 वी नवोदय : अंकगणित - संख्या आणि संख्या पद्धती - स्वाध्याय 1.1


                               या पोस्ट मध्ये, इयत्ता 6 वीत प्रवेशासाठी, जवाहर नवोदय विद्यालय यांच्याकडून जी प्रवेशपरीक्षा घेतली जाते, तिच्या अंकगणितचे पहिले  प्रकरण, ज्याचे नाव आहे - संख्या आणि संख्या पद्धती, याच्या अंकगणितच्या  स्वाध्याय 1.1 मधील सर्व उदाहरणे सोप्या पद्धतीने सोडवून दिलेली आहेत. 6 वी नवोदय : अंकगणित - संख्या आणि संख्या पद्धती - स्वाध्याय 1.1 मधील उदाहरणे खालील प्रमाणे आहेत,

प्र. 1. 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती ?

         (A)    सातशे त्रेपन्न, तीनशे सत्तावन

              (B) सातशे त्रेपन्न हजार, तीन सत्तावन

              (C) सातशे त्रेपन्न हजार, तीनशे सत्तावन

              (D) सात त्रेपन्न हजार, तीन सत्तावन

उत्तर :

प्र. 1. 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती ?

स्पष्टीकरण :

7,53,357 या संख्येचे वाचन दोन प्रकारे केले जाते :

सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन किंवा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन.

दिलेल्या पर्यायांप्रमाणे योग्य उत्तर (C) आहे.

प्र. 2. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती ?

               (A) 98461 (B) 98641 (C) 98614 (D) 98416

उत्तर :

प्र. 2. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती ?

स्पष्टीकरण :

दिलेले अंक → 1, 4, 6, 8, 9

सर्वात मोठी पाच अंकी संख्या म्हणजेच दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावणे.

∴ सर्वात मोठी पाच अंकी संख्या = 98,641

प्र. 3. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यांमधील फरक किती आहे ?

                (A) 1 (B) 90000 (C) 90001 (D) 900001

 उत्तर :

प्र. 3. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यांमधील फरक किती आहे ?

स्पष्टीकरण :

किमान 6 अंकी संख्या (लहान) = 1,00,000

कमाल 4 अंकी संख्या (मोठी) = - 9,999

फरक म्हणजेच वजाबाकी = 90,001

प्र. 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती ?

                (A) 1092 (B) 1290 (C) 2091 (D) 2190

उत्तर :

प्र. 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती ?

स्पष्टीकरण :

दशकस्थानी 9 पाहिजे आणि उर्वरित अंक वेगवेगळे असायला हवेत.

किमान म्हणजेच लहान संख्या शोधायची आहे.

(A) पर्यायामध्ये दिलेली संख्या सर्वात लहान आहे. 

∴ उत्तर 1092.

प्र. 5. पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते :

                (A) 5055 (B) 5505 (C) 5550 (D) 5555

 उत्तर :

प्र. 5. पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते :

स्पष्टीकरण :

पाच हजार पाचशे पंचावन्न

हजार (5) → शतक (5) → दशक (5) → एकक (5)

∴ संख्या = 5,555

प्र. 6. कमाल ते किमान अशा क्रमांकांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे ?

           (A)    81427, 16378, 82341, 63178

                (B) 16378, 63178, 82341, 41427

                (C) 81427, 82341, 63178, 16378

                (D) 82341, 81427, 63178, 13378

उत्तर :

प्र. 6. कमाल ते किमान अशा क्रमांकांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे ?

स्पष्टीकरण :

कमाल ते किमान → मोठी ते लहान संख्या 

म्हणजेच उतरता क्रम लावायचा आहे.

योग्य क्रम : 82,341 ; 81,427 ; 63,178 ; 13,378

प्र. 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून, बनणारी लहानांत लहान विषम संख्या आहे —

                 (A) 10345 (B) 10453 (C) 10543 (D) 10435

उत्तर :

प्र. 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून, बनणारी लहानांत लहान विषम संख्या आहे —

स्पष्टीकरण :

दिलेले अंक = 1, 0, 3, 4, 5

लहानात लहान संख्या ⇒ चढता क्रम लावणे: 01345

परंतु, शून्य हा अंक दिलेला असल्यास त्याला दुसऱ्या क्रमांकावर लिहावे ⇒ 10345.

शेवटी 5 असल्यामुळे ही विषम संख्या देखील आहे.


प्र. 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, तर x, y आणि z यांच्या किंमती क्रमश: लिहा :

                  (A) 6, 5, 7 (B) 5, 6, 7 (C) 7, 6, 5 (D) 6, 7, 5

8 1 x
3 y z
4 9 2

उत्तर : 

प्र. 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, तर x, y आणि z यांच्या किंमती क्रमश: लिहा :1


प्र. 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, तर x, y आणि z यांच्या किंमती क्रमश: लिहा :2


प्र. 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, तर x, y आणि z यांच्या किंमती क्रमश: लिहा :3
   

स्पष्टीकरण :

पहिल्या उभ्या स्तंभाची बेरीज = 8 + 3 + 4 = 15

आता, आडवी, उभी किंवा तिरपी सर्व बेरीज 15 आली पाहिजे.

1) x ची किंमत काढणे (पहिली आडवी ओळ) :

8 + 1 + x = 15

9 + x = 15

x = 15 - 9 
x = 6 
x = 6

2) y ची किंमत काढणे (मधला उभा स्तंभ) :

1 + y + 9 = 15

10 + y = 15

y = 15 - 10 
y = 5 
y = 5

3) z ची किंमत काढणे (तिसरा उभा स्तंभ) :

x + z + 2 = 15

6 + z + 2 = 15 

8 + z = 15

z = 15 - 8 
z = 7 
z = 7

∴ x = 6, y = 5, z = 7

योग्य पर्याय (A) 6, 5, 7 आहे.


                          अशा प्रकारे 6 वी नवोदय : अंकगणित - संख्या आणि संख्या पद्धती - स्वाध्याय 1.1 मधील सर्व उदाहरणे अगदी सोप्या पद्धतीने सोडवून दिलेली आहेत.

Video Explanation :






No comments

Powered by Blogger.