8 वी - महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Be the Best & Androcles and the Lion


8 वी - महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Be the Best & Androcles and the Lion 


                            या पोस्ट मध्ये, 8 वी महाराष्ट्र बोर्ड च्या इंग्रजी या विषयाच्या यूनिट 1 मधील Be the Best & Androcles and the Lion यावरची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1)  Be the best या कवितेमध्ये छोट्या वस्तूंची तुलना मोठ्या वस्तूंशी केली आहे. 

2) या कवितेत समजून सांगितले आहे की कोणताही जॉब किंवा कोणतीही नोकरी किंवा कोणतेही क्षेत्र हे कमी नसते. 

3) ज्याही क्षेत्रात आपण कार्यरत आहोत, ते काम आपण पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे. 

4) त्या कामातलं बेस्ट आपल्याला बनता आलं पाहिजे.

5) एंड्रोकल्स आणि सिंह. ही एंड्रोकल्स नावाच्या एका गुलामाची गोष्ट आहे.

6) हा गुलाम दयाळू असतो, नम्र असतो, प्रामाणिक असतो आणि आपल्या मालकाची सेवा करत असतो. 

7) परंतु त्याचा मालक खूप क्रूर असतो.

8) त्याच्या राज्यात असा नियम असतो की मालक कितीही क्रूर असू दे, गुलाम त्याला सोडून जाऊ शकत नाही. 

9) गुलाम जर का त्याला सोडून पळाला, तर तो खूप मोठा गुन्हा मानला जाई.

10) कायद्याने त्यांना आपल्या मालकांचे गुलाम बनून राहणे अनिवार्य होते.

11) एंड्रोकल्सला त्याचा मालक आवडत नव्हता, म्हणून तो नेहमी प्रयत्नात असायचा की कधी त्याला संधी भेटते आणि तो त्याच्या मालकाला सोडून पळून जातो.

12) एके वेळी असंच होते, त्याला अशी संधी सापडते आणि तो त्याच्या मालकाला सोडून जंगलात निघून जातो.

13) जंगलामध्ये त्याला राहायला छत नसते, व्यवस्थित खायला प्यायला त्याला भेटत नाही, तरीसुद्धा त्या मालकाच्या जाळ्यातून सुटून त्याला खूप आनंद मिळालेला असतो.

14) असंच जंगलात राहत असताना अचानक एकदा एक सिंह, एंड्रोकल्सच्या समोर येऊन उभा राहतो.

15) त्या सिंहाला पाहून एंड्रोकल्स तिथून पळून जाण्याचा विचार करतो. परंतु तो सिंह, एंड्रोकल्सवर हल्ला करत नाही.

16) उलट त्याकडे दयनीय अवस्थेने पाहत उभा राहतो. तेव्हा एंड्रोकल्सला समजते की या सिंहाला काहीतरी दुखापत झालेली आहे.

17) एंड्रोकल्स हळू हळू घाबरत घाबरत त्याच्या जवळ जातो. तेव्हा सिंह त्याच्या पायाला, पुढच्या पंजाला जिभेने चाटत असतो.

18) त्यावरून एंड्रोकल्सला समजते की या सिंहाला पायाला दुखापत झालेली आहे.

19) तो बघतो तर एक काटा रुतलेला असतो त्या पायामध्ये, एंड्रोकल्स तो काटा हळुवारपणे काढतो आणि आपल्या कपड्याचा एक तुकडा तोडून त्याला बँडेज बांधतो.

20) असंच पुढचे काही दिवस चालू राहते. 

21) एंड्रोकल्स आणि तो सिंह एकमेकांसोबत राहतात. एकमेकांचे मित्र बनतात. 

22) तो सिंह आता शिकार करू शकत नसल्यामुळे एंड्रोकल्स शिकार करून आणतो आणि आपल्या शिकारीचा काही भाग त्या सिंहाला खायला देतो.

23) "मध्यंतरी ॲन्ड्रोकल्सचा मालक  राजाकडे जाऊन ॲन्ड्रोकल्स पळून गेला आहे याबद्दल तक्रार करतो.

24) राजाचे सैन्य ॲन्ड्रोकल्सला शोधण्यासाठी जंगलात आलेले असते. 

25) ॲन्ड्रोकल्स जंगलामध्ये शिकारीच्या शोधात गेलेला असतो आणि गुहेमध्ये सिंह आराम करत असतो.

26) राजाचे सैन्य ॲन्ड्रोकल्सला आणि सिंहाला दोघांना पकडतात आणि शहरात घेऊन येतात. 

27) ॲन्ड्रोकल्सला साखळ्या बांधून तुरुंगात ठेवले जाते. तर सिंहाला पिंजऱ्यामध्ये कैद केले जाते. 

28) काही दिवसांनंतर एक सर्कस भरवली जाते. 

29) सर्कसमध्ये एका भल्यामोठ्या पिंजऱ्यामध्ये ॲन्ड्रोकल्सला सोडले जाते. 

30) त्याकाळी त्यांच्या राज्यामध्ये असा नियम असतो की जर का कोणी गुलाम त्याच्या मालकाला सोडून पळून जायचा प्रयत्न करेल, तर तो एक खूप मोठा गुन्हा मानला जात असे आणि त्याला शिक्षा म्हणून जंगली प्राण्यांच्या समोर टाकून दिले जाई.

31) ॲन्ड्रोकल्सने हा नियम मोडला होता, म्हणून ॲन्ड्रोकल्सला त्या पिंजऱ्यामध्ये सोडण्यात आले होते.

32) पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा त्यात एक जंगली सिंहाला सोडण्यात आले. 

33) सिंहाला खूप दिवसांपासून भुकेले ठेवलेले होते.  

34) सिंहाला काहीच खायला न मिळाल्याने, सिंह एकदम क्रूर बनला होता. 

35) तो त्याच्या समोर ॲन्ड्रोकल्सला पाहून त्याच्याकडे जोरदार धाव घेतो. परंतु धाव घेत असतानाच काही अंतर पुढे गेल्यानंतर तो थांबून जातो आणि हळूवारपणे ॲन्ड्रोकल्सकडे जायला लागतो. 

36) ॲन्ड्रोकल्स त्या सिंहाला वेगाने आपल्याकडे येत पाहून खूप घाबरून जातो. त्याला समजून चुकलेले असते की हा आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. तरीसुद्धा तो धैर्यवान असल्याचं भासवतो. 

37) सिंहाला अचानक अंगावर आलेलं पाहून आणि काही अंतरावर अचानक थांबलेलं पाहून, ॲन्ड्रोकल्स गोधळून जातो. नंतर त्याला समजते की तो सिंह दुसरा-तिसरा कोणी नसून, तोच सिंह होता ज्याला त्याने जंगलामध्ये मदत केली होती. 

38) सिंहाला सुद्धा ॲन्ड्रोकल्स असल्याचं समजते. दोन्ही मित्र खूप दिवसांनंतर एकमेकांना भेटतात, एकमेकांना मिठी मारतात. 

39) हे सगळं पाहून सर्कसमध्ये बघण्यासाठी जमलेला राजा आणि प्रजा. दोन्ही खुश होतात, भारावून जातात. 

40) नंतर राजा ॲन्ड्रोकल्सला विचारतो, काय घडले त्याबाबत. ॲन्ड्रोकल्स तपशीलवार सगळ्या घटनेची माहिती राजाला देतो. 

41) राजा ॲन्ड्रोकल्सला त्या गुन्ह्यातून मुक्त करतो आणि त्याला सांगतो की तू आता गुलाम राहिलेला नाहीस, तुला जिथे जायचं आहे तिथे तू जाऊ शकतो. आणि अजून तुला काय हवंय तेही सांग, तेही बक्षीस मी तुला देतो. 

42) ॲन्ड्रोकल्स बक्षीस स्वतःसाठी न मागता, राजाला म्हणतो, या सिंहाला सुद्धा सोडून दे, त्याला सुद्धा मुक्त कर. 

43) राजा ॲन्ड्रोकल्सचं म्हणणं ऐकतो, सिंहाला मुक्त करतो आणि नंतर ॲन्ड्रोकल्स आणि तो सिंह असे दोन्हीही मित्र जंगलामध्ये निघून जातात."



8 वी - महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Be the Best & Androcles and the Lion



8 वी - महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट 

Be the Best & Androcles and the Lion 

टाईम : 30 मिनिटे 

मार्क्स : 30


सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

SECTION A: POEM — "BE THE BEST" (15 MARKS)


Q1. If you cannot be a pine on the top of the hill, what should you be?

[A] A scrub in the valley

[B] A bush in the forest

[C] A tree in the garden

[D] A flower in the field


Q2. According to the poet, where is the best little scrub found?

[A] Under the tall trees

[B] By the side of the rill

[C] On the high mountains

[D] Deep inside the woods


Q3. If you can't be a bush, what should you be according to the poem?

[A] A tall pine tree

[B] A small wild flower

[C] A bit of the grass

[D] A leaf on a branch


Q4. What does a "bit of the grass" make happier?

[A] The wide blue ocean

[B] The long dusty highway

[C] The dark green forest

[D] The high snowy peaks


Q5. If you are a Muskie, what should you try to be?

[A] A bigger whale

[B] A swifter shark

[C] A livelier bass

[D] A golden dolphin


Q6. What point is the poet making by referencing "Muskie" and "Bass"?

[A] Types of animals

[B] Types of fresh fish

[C] Types of sea birds

[D] Types of lake weeds


Q7. Why can't we all be captains in the ship of life?

[A] Ships are too small

[B] Captaincy is difficult

[C] There must be a crew

[D] Nobody wants to work



अजून वाचून पहा : 8 वी - महाराष्ट्र बोर्ड - गणित टेस्ट - चॅप्टर 1 - Rational and Irrational numbers



Q8. What kind of work is available for people in the world?

[A] Only big important tasks

[B] Only small easy jobs

[C] Big work and lesser tasks

[D] No work for the small


Q9. Which task should one prioritize and perform first?

[A] The most famous task

[B] The one that is near

[C] The most difficult task

[D] The one that pays well


Q10. If you cannot be a grand highway, what should you be?

[A] A narrow sidewalk

[B] A small dusty trail

[C] A wide city street

[D] A bridge over water


Q11. If you cannot be the sun, what should you be?

[A] A bright white moon

[B] A small twinkling star

[C] A dark rain cloud

[D] A glowing firefly


Q12. According to the poem, what does NOT determine success or failure?

[A] The size you are

[B] The effort you give

[C] The skills you have

[D] The path you choose


Q13. Who is the poet of the inspirational poem "Be the Best"?

[A] Robert Frost

[B] Douglas Malloch

[C] William Wordsworth

[D] Rudyard Kipling


Q14. What is the fundamental, overarching message of the poem?

[A] Always strive to be the leader

[B] Be the best version of yourself

[C] Seek out only large, visible tasks

[D] Constantly compete with others


Q15. What does the specific word "Rill" mean in the context of the poem?

[A] A large mountain peak

[B] A small stream or brook

[C] A thick, dense forest

[D] A deep, rocky valley


SECTION B: PROSE — "ANDROCLES AND THE LION" (15 MARKS)


Q16. In ancient times, what was the socio-economic status of Androcles?

[A] A wealthy merchant

[B] A brave soldier

[C] A poor slave

[D] A royal palace guard


Q17. How did Androcles' master treat his slaves?

[A] With great kindness and respect

[B] Cruelly, harshly, and starved them

[C] Like his own family members

[D] He completely ignored their presence


Q18. Where did Androcles take shelter immediately after escaping captivity?

[A] In a nearby rural village

[B] In a crowded metropolitan city

[C] In a secluded forest cave

[D] On a commercial wooden ship


Q19. What specific sound did Androcles hear while hiding in the forest?

[A] A bird singing sweetly

[B] A lion moaning in distress

[C] A hunter shouting orders

[D] A river flowing rapidly


Q20. Why didn't the lion attack Androcles during their first encounter?

[A] It was not feeling hungry

[B] It was too old to hunt

[C] It was in great physical pain

[D] It was a trained, tame lion


Q21. What was the exact cause of the lion's severe distress?

[A] A hunter's embedded arrow

[B] A broken front leg bone

[C] A large thorn piercing its toe

[D] A poisonous snake bite


Q22. How did Androcles display his courage and bravery?

[A] By fighting the lion with a stick

[B] By approaching and pulling out the thorn

[C] By running away as fast as possible

[D] By shouting loudly to call for assistance


Q23. What did the lion do immediately after the thorn was removed?

[A] It bit Androcles out of instinct

[B] It ran away further into the woods

[C] It licked his hand out of gratitude

[D] It roared loudly to assert dominance


Q24. How long did Androcles and the lion live peacefully together in the wild?

[A] For many years

[B] For several days

[C] Only for about one hour

[D] Continually until they passed away


Q25. Where were Androcles and the lion eventually captured by authorities?

[A] In a bustling city market

[B] Separately within the forest

[C] At the master's private house

[D] Near a riverbank while drinking water


Q26. What was the severe legal punishment for runaway slaves in ancient Rome?

[A] Paying a heavy financial fine

[B] Sent to a maximum-security prison

[C] Thrown to wild beasts in public arenas

[D] Working indefinitely in dark mineral mines


Q27. What surprising event occurred when the starved lion was released into the arena?

[A] It quickly attacked and killed Androcles

[B] It pounced on the arena guards instead

[C] It recognized Androcles and showed affection

[D] It ignored everyone and fell asleep on the ground


Q28. How did the Emperor react to this highly unusual arena spectacle?

[A] He became incredibly angry at the delay

[B] He was filled with absolute wonder and amazement

[C] He immediately ordered more dangerous beasts

[D] He stood up and left the arena in disgust


Q29. When offered a reward by the Emperor, what did Androcles request?

[A] A massive amount of gold and treasures

[B] Complete ownership of his former master's estate

[C] The immediate freedom of the lion along with himself

[D] A high-ranking military post in the Roman army


Q30. What is the primary moral lesson taught by the story of Androcles?

[A] Slaves should escape at the first opportunity

[B] Lions are inherently dangerous creatures

[C] Kindness is reciprocal and never goes to waste

[D] Emperors are always fair in their judgements




                           इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.




No comments

Powered by Blogger.