MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - राज्यशास्त्र - राज्यघटना : घटनात्मक विकास व निर्मिती चाचणी
MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - राज्यशास्त्र - राज्यघटना : घटनात्मक विकास व निर्मिती चाचणी
या पोस्ट मध्ये, MPSC परिक्षेतील, राज्यशास्त्र या विषयामधील, राज्यघटना : घटनात्मक विकास व निर्मिती या टॉपिकची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील मुद्दे लक्षात घेतले गेले आहेत -
MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - राज्यशास्त्र
राज्यघटना : घटनात्मक विकास व निर्मिती चाचणी
टाईम : 30 मिनिटे
मार्क्स : 30
सूचना :
विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.
सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत.
प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.
या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.
टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे.
टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.
टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे.
या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
प्रश्न 1. कोणत्या कायद्याद्वारे बंगालचा गव्हर्नर हा "बंगालचा गव्हर्नर जनरल" बनला?
A) 1773 चा नियामक कायदा
B) 1784 चा पीट्स इंडिया ॲक्ट
C) 1813 चा सनदी कायदा
D) 1833 चा सनदी कायदा
प्रश्न 2. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती?
A) लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज
B) लॉर्ड विल्यम बेंटींग
C) लॉर्ड कॅनिंग
D) लॉर्ड माऊंटबॅटन
प्रश्न 3. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना (1 मुख्य व 3 इतर न्यायाधीश) कोणत्या वर्षी झाली?
A) 1773
B) 1774
C) 1784
D) 1813
प्रश्न 4. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय कार्यात विभाजन कोणत्या कायद्यान्वये करण्यात आले?
A) 1773 चा नियामक कायदा
B) 1784 चा पीट्स इंडिया ॲक्ट
C) 1833 चा सनदी कायदा
D) 1858 चा कायदा
प्रश्न 5. कोणत्या कायद्यास "सेटलमेंट कायदा" (Act of Settlement) असेही म्हटले जाते?
A) 1773 चा नियामक कायदा
B) 1784 चा पीट्स इंडिया ॲक्ट
C) 1813 चा सनदी कायदा
D) 1853 चा सनदी कायदा
अजून वाचून पहा : MPSC सराव प्रश्नपत्रिका - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास
प्रश्न 6. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी (चहा व अफू सोडून) कोणत्या कायद्याने संपुष्टात आली?
A) 1793 चा कायदा
B) 1813 चा सनदी कायदा
C) 1833 चा सनदी कायदा
D) 1853 चा सनदी कायदा
प्रश्न 7. कोणत्या कायद्याद्वारे सत्तेचे केंद्रिकरण पूर्ण झाले आणि ब्रिटीशांच्या ताब्यातील संपूर्ण प्रदेशावर एक केंद्रीय शासन निर्माण झाले?
A) 1813 चा सनदी कायदा
B) 1833 चा सनदी कायदा
C) 1853 चा सनदी कायदा
D) 1858 चा भारत सरकारचा कायदा
प्रश्न 8. पहिल्यांदाच नागरी सेवा भरतीसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न किंवा तरतूद कोणत्या सनदी कायद्यात करण्यात आली?
A) 1813
B) 1833
C) 1853
D) 1861
प्रश्न 9. नागरी सेवा भरतीसाठी नेमण्यात आलेल्या मेकॉले समितीचा अहवाल कोणत्या वर्षी सादर झाला?
A) 1853
B) 1854
C) 1856
D) 1858
प्रश्न 10. 1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आणणारा कायदा कोणता?
A) 1853 चा सनदी कायदा
B) 1858 चा भारत सरकारचा कायदा
C) 1861 चा भारतीय कौन्सिल कायदा
D) 1892 चा कायदा
प्रश्न 11. 1858 च्या कायद्यानुसार भारतातील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळात कोणते नवीन पद निर्माण झाले?
A) व्हाईसरॉय
B) भारतमंत्री
C) गव्हर्नर जनरल
D) मुख्य सचिव
प्रश्न 12. भारताचे पहिले व्हाईसरॉय बनण्याचा बहुमान कोणाला मिळाला?
A) लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज
B) लॉर्ड विल्यम बेंटींग
C) लॉर्ड कॅनिंग
D) लॉर्ड माऊंटबॅटन
प्रश्न 13. लॉर्ड कॅनिंगने 1859 ला सुरू केलेल्या खाते विभागणी (Portfolio System) ला कोणत्या कायद्याने मान्यता दिली?
A) 1858 चा कायदा
B) 1861 चा भारतीय कौन्सिल कायदा
C) 1892 चा भारतीय कौन्सिल कायदा
D) 1909 चा कायदा
प्रश्न 14. 1861 च्या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या कायदेविषयक कौन्सिलमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय अशासकीय सदस्याची नेमणूक झाली नव्हती?
A) बनारसचा राजा
B) पतियाळाचे महाराज
C) सर दिनकर राव
D) एस. पी. सिन्हा
प्रश्न 15. व्हाईसरॉयला आणीबाणीच्या स्थितीत कायदेमंडळाच्या परवानगीशिवाय अध्यादेश (Ordinance) काढण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला?
A) 1833 चा कायदा
B) 1861 चा भारतीय कौन्सिल कायदा
C) 1892 चा कायदा
D) 1919 चा कायदा
प्रश्न 16. 1861 च्या कायद्यानुसार काढलेल्या अध्यादेशाचा कालावधी जास्तीत जास्त किती महिने चालू शकत होता?
A) 3 महिने
B) 6 महिने
C) 9 महिने
D) 12 महिने
प्रश्न 17. कायदेमंडळाच्या सदस्यांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा व सार्वजनिक हिताच्या बाबींवर प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने मिळाला?
A) 1861 चा कायदा
B) 1892 चा भारतीय कौन्सिल कायदा
C) 1909 चा कायदा
D) 1919 चा कायदा
प्रश्न 18. 1909 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात पहिले (कायदा सदस्य) हिंदी सभासद म्हणून कोणाची नेमणूक झाली?
A) के. जी. गुप्ता
B) सय्यद हुसेन बिलग्रामी
C) एस. पी. सिन्हा
D) सर दिनकर राव
प्रश्न 19. कोणत्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून 'स्वतंत्र मतदारसंघ' संकल्पना मान्य करण्यात आली?
A) 1892 चा कायदा
B) 1909 चा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
C) 1919 चा मोंटग्यू-चेम्सफोर्ड कायदा
D) 1935 चा कायदा
प्रश्न 20. 'सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक' म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
A) लॉर्ड मोर्ले
B) लॉर्ड मिंटो
C) लॉर्ड चेम्सफोर्ड
D) लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज
प्रश्न 21. केंद्रात दोन गृहे प्रस्थापित करणारी (द्विगृह - Bicameral) पद्धती कोणत्या कायद्यानुसार लागू करण्यात आली?
A) 1909 चा कायदा
B) 1919 चा मोंटग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
C) 1935 चा भारत सरकार कायदा
D) 1947 चा स्वातंत्र्य कायदा
प्रश्न 22. 1919 च्या मोंटग्यू-चेम्सफोर्ड कायद्यानुसार प्रांतांमध्ये कोणती राज्यपद्धती लागू करण्यात आली?
A) प्रांतीय स्वायत्तता
B) द्विदल राज्यपद्धती (Dyarchy)
C) संघराज्य पद्धती
D) केंद्रीय नियंत्रण
प्रश्न 23. 1919 च्या कायद्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना 'ली कमिशन'च्या शिफारशीवरून कोणत्या वर्षी झाली?
A) 1921
B) 1923
C) 1926
D) 1935
प्रश्न 24. 1935 च्या भारत सरकार कायद्यामध्ये एकूण किती कलमे आणि परिशिष्टे होती?
A) 395 कलमे व 8 परिशिष्ट्ये
B) 321 कलमे व 10 परिशिष्ट्ये
C) 448 कलमे व 12 परिशिष्ट्ये
D) 250 कलमे व 9 परिशिष्ट्ये
प्रश्न 25. 1935 च्या कायद्यानुसार राज्यकारभाराची वाटणी करताना शेषाधिकार (Residuary Powers) कोणाकडे देण्यात आले होते?
A) केंद्रीय विधीमंडळ
B) प्रांतीय विधीमंडळ
C) व्हाईसरॉय
D) ब्रिटीश संसद
प्रश्न 26. भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक ब्रिटिश संसदेत कधी मांडण्यात आले आणि इंग्लंडच्या राजाची मान्यता त्याला कधी मिळाली?
A) 4 जुलै 1947 व 18 जुलै 1947
B) 15 ऑगस्ट 1947 व 26 जानेवारी 1950
C) 3 जून 1947 व 15 ऑगस्ट 1947
D) 2 जुलै 1947 व 14 जुलै 1947
प्रश्न 27. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले?
A) डॉ. राजेंद्र प्रसाद
B) लॉर्ड माऊंटबॅटन
C) सी. राजगोपालाचारी
D) जवाहरलाल नेहरू
प्रश्न 28. जेव्हा संविधान सभा भारताचे कायदेमंडळ (विधिमंडळ) म्हणून पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 1947 रोजी भरली, तेव्हा तिचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
A) डॉ. राजेंद्र प्रसाद
B) जी. व्ही. माळवणकर
C) डॉ. बी. आर. आंबेडकर
D) सच्चिदानंद सिन्हा
प्रश्न 29. 1946 च्या अंतरिम सरकारमधील सदस्यांच्या यादीनुसार 'वित्त' (Finance) खाते कोणाकडे होते?
A) डॉ. जॉन मथाई
B) लियाकत अली खान
C) आर. के. षण्मुगम चेट्टी
D) जगजीवन राम
प्रश्न 30. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात (1947) कायदा मंत्री (Law Minister) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?
A) जोगिंदर नाथ मंडल
B) डॉ. बी. आर. आंबेडकर
C) जवाहरलाल नेहरू
D) सरदार वल्लभभाई पटेल

Post a Comment