6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test 1
6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test 1
या पोस्ट मध्ये इयत्ता 6 वी नवोदय परीक्षा, यातील अंकगणित विषयाची पहिली सराव टेस्ट दिलेली आहे. या टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रत्येक प्रश्नला प्रत्येकी 1-1 गुण आहे, अशा पद्धतीने संपूर्ण टेस्ट एकूण 10 मार्क्स ची बनवण्यात आलेली आहे. ही टेस्ट सोडवण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. ही टेस्ट सुरू करण्याआधी विद्यार्थ्याने आपले संपूर्ण नाव लिहिणे आवश्यक आहे त्या शिवाय टेस्ट पुढे सरकणार नाही. टेस्ट सबमिट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोड़वणे आवश्यक आहेत. ही टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जायचे आहे तिथे ही टेस्ट विद्यार्थ्याना देता येईल. या टेस्ट मध्ये विचारण्यात आलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
विषय: नवोदय प्रवेश परीक्षा - 6 वी (गणित चाचणी)
एकूण प्रश्न: 10
एकूण गुण: 10
वेळ: 15 मिनिटे
1) 7, 0, 1, 2 आणि 3 या अंकांचा वापर करून बनणारी सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या कोणती?
A) 10237
B) 10273
C) 01237
D) 10037
2) 1 ते 50 मधील सर्व मूळ संख्यांची एकूण संख्या किती आहे?
A) 12
B) 15
C) 10
D) 25
अजून वाचून पहा : 6 वी नवोदय : अंकगणित - पूर्ण संख्यांवरील चार मुलभूत क्रिया - स्वाध्याय 2.1
3) लसावि काढा : 12, 24 आणि 36
A) 36
B) 48
C) 72
D) 12
4) 4.25 + 7.5 + 0.005 = किती?
A) 11.755
B) 11.80
C) 4.330
D) 12.005
5) एका वस्तूला 450 रुपयांना विकल्यास 50 रुपये तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
A) 400 रुपये
B) 500 रुपये
C) 450 रुपये
D) 550 रुपये
6) 3/5 या अपूर्णांकाची टक्केवारी किती होईल?
A) 30%
B) 50%
C) 60%
D) 75%
7) दरसाल दरशेकडा 10 टक्के दराने 500 रुपयांचे 3 वर्षांचे सरळव्याज किती होईल?
A) 150 रुपये
B) 50 रुपये
C) 100 रुपये
D) 200 रुपये
8) एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल?
A) 32 चौसेमी
B) 64 चौसेमी
C) 16 चौसेमी
D) 24 चौसेमी
9) जर 24 व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती व्यक्तींची गरज असेल?
A) 30 व्यक्ती
B) 20 व्यक्ती
C) 15 व्यक्ती
D) 32 व्यक्ती
10) पुढील पदावली सोडवा: 20 ÷ 5 × 2 + 8 - 3 = ?
A) 7
B) 13
C) 11
D) 5
ही टेस्ट इथून खाली सुरू होत आहे.

Post a Comment