6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test - 3
6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test - 3
२) जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त असते, त्यावेळी त्या व्यवहारामध्ये आपल्याला तोटा होतो किंवा loss होतो.
3) आणि ज्यावेळी एखाद्या वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतपेक्षा जास्त असते, त्यावेळेला त्या व्यवहारामध्ये आपल्याला नफा होतो किंवा profit होतो.
4) अशी वेगवेगळ्या प्रकारची 10 उदाहरणे या test मध्ये नफा आणि तोटा या topic वर दिलेली आहेत.
5) काही उदाहरणांमध्ये नफा आणि तोटा रुपयांमध्ये काढायला सांगितला आहे, तर काही उदाहरणांमध्ये नफा किंवा तोटा टक्क्यांमध्ये काढायला सांगितलेला आहे.
6) नफा टक्क्यांमध्ये जर का काढायचा असेल, तर जेवढा पण नफा झालेला आहे, त्याला divide करायला लागतं खरेदी किंमतने आणि multiply by 100 जर का आपण केलं, तर आपल्याला percentage नफा मिळतो.
7) जर का percentage तोटा काढायचा असेल, तर तोटा किती झाला ती किंमत divide by वस्तूची खरेदी किंमत multiply by 100, या formula चा वापर करून आपण किती टक्के तोटा झाला किंवा percentage तोटा किती झाला हे आपण काढू शकतो.
8) तसेच काही उदाहरणांमध्ये आपल्याला एखादी वस्तू खरेदी किंमतीपेक्षा 10% तोट्याने विकली किंवा 5% तोट्याने विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? असेही प्रश्न विचारलेले आहेत.
9) तर काही वेळा एखादी वस्तू एखाद्या किंमतीमध्ये विकलेली आहे आणि त्याच्यावर काहीतरी टक्क्यांनी नफा झालेला आहे, असं सुद्धा आपल्याला काही उदाहरणांमध्ये दिलेलं आहे आणि त्यावरून त्या वस्तूची खरेदी किंमत काढायला सांगितलेलं आहे.
6 वी नवोदय सराव परीक्षा
विषय - अंकगणित - Test 3
एकूण गुण: ३० (प्रत्येक प्रश्नाला ३ गुण)
वेळ: ३० मिनिटे
प्र. 1) एका वस्तूची खरेदी किंमत Rs. 400 आणि विक्री किंमत Rs. 480 आहे, तर नफा किती होईल?
A) Rs. 60
B) Rs. 80
C) Rs. 100
D) Rs. 120
प्र. 2) एका वस्तूची खरेदी किंमत Rs. 500 असून ती Rs. 450 ला विकली, तर किती टक्के तोटा झाला?
A) 5%
B) 8%
C) 10%
D) 12%
प्र. 3) Rs. 1200 ची वस्तू 20% नफ्याने विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल?
A) Rs. 1320
B) Rs. 1400
C) Rs. 1440
D) Rs. 1500
अजून वाचून पहा : 6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test 1
प्र. 4) एका दुकानदाराने एक टेबल Rs. 800 ला खरेदी केले व त्याच्या दुरुस्तीवर Rs. 200 खर्च केले. ते टेबल Rs. 1200 ला विकले, तर नफा किती टक्के झाला?
A) 10%
B) 15%
C) 20%
D) 25%
प्र. 5) 10 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किंमतीएवढी आहे, तर किती टक्के नफा झाला?
A) 20%
B) 25%
C) 30%
D) 35%
प्र. 6) एका माणसाने Rs. 1500 ला एक सायकल खरेदी केली आणि 10% तोट्याने विकली, तर सायकलची विक्री किंमत किती?
A) Rs. 1350
B) Rs. 1400
C) Rs. 1450
D) Rs. 1250
प्र. 7) Rs. 600 ची वस्तू विकल्यामुळे Rs. 100 नफा झाला, तर नफ्याची टक्केवारी किती?
A) 15%
B) 20%
C) 25%
D) 30%
प्र. 8) एक वस्तू Rs. 720 ला विकल्यामुळे 10% तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
A) Rs. 750
B) Rs. 800
C) Rs. 850
D) Rs. 900
प्र. 9) एका व्यापाऱ्याने 12 आंबे Rs. 60 ला खरेदी केले आणि ते सर्व आंबे Rs. 72 ला विकले. तर त्याला किती नफा झाला?
A) Rs. 10
B) Rs. 12
C) Rs. 15
D) Rs. 18
प्र. 10) Rs. 2500 ची वस्तू 15% नफ्याने विकल्यास किती रुपये नफा होईल?
A) Rs. 300
B) Rs. 350
C) Rs. 375
D) Rs. 400
इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.

Post a Comment