MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित - अंकगणितातील पायाभूत उदाहरणे

 

MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित -

 अंकगणितातील पायाभूत उदाहरणे 


                                  या पोस्ट मध्ये, MPSC परिक्षेतील, अंकगणित या विषयामधील, अंकगणितातील पायाभूत उदाहरणे या टॉपिकची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील मुद्दे लक्षात घेतले गेले आहेत -

1) Basics of Mathematics किंवा अंकगणितावरील पायाभूत उदाहरणे यांच्यामध्ये सगळ्यात आधी दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत शिकवलेली आहे.

2) तसेच एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर का 5 हा अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढतात, हे सुद्धा येथे समजून सांगितलेले आहे.

3) ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असेल त्याचा वर्ग कसा काढायचा, एखादी संख्या जर का तीन अंकी असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा याबाबतची माहिती सुद्धा या प्रकरणामध्ये दिलेली आहे.

4) तसेच एखादी संख्या दिलेली असताना त्या संख्येचं वर्गमूळ कसं काढलं जाते, वर्गमूळ काढत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा या प्रकरणामध्ये केलेली आहे.

5) तसेच दिलेल्या संख्येचा घन किंवा Cube कसा काढला जातो, जर का एखादी संख्या दिलेली असेल तर ती कोणाचा घन आहे किंवा तिचे घनमूळ काय आहे हे सुद्धा कसे काढावे हे सोप्यात सोप्या पद्धतीने इथे सांगितलेले आहे.

6) बेरीज आणि वजाबाकी करत असताना काही महत्त्वाचे नियम लक्षात घ्यायचे असतात. जसे की, दोन Plus च्या संख्या असतील तर त्यांची Direct Plus करावी. दोन Minus च्या संख्या असतील तर Minus चं चिन्ह Common घ्यायचं आणि दोघे संख्यांची Addition करायची. एक संख्या Plus आणि एक संख्या जर का Minus असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे.

7) याच पद्धतीने या प्रकरणामध्ये गुणाकार आणि भागाकाराचे नियम सुद्धा दिलेले आहेत. दोन्ही संख्या Plus असतील तर गुणाकाराला Plus चं चिन्ह येईल. दोन्ही संख्या Minus असतील तर गुणाकाराला Plus चं चिन्ह येईल. एक संख्या Plus आणि एक संख्या Minus असेल तर गुणाकाराला नेहमी Minus चं चिन्ह असेल. 

8) जे गुणाकाराचे नियम आहेत तेच नियम जसे च्या तसे भागाकाराला सुद्धा लागू पडतात.

9) यानंतर या प्रकरणामध्ये संख्यांचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. Real numbers काय असतात, Imaginary numbers काय असतात, Complex numbers काय असतात, Rational numbers कोणाला म्हणतात, Irrational numbers काय असतात, Integers कोणते, Fractional numbers कोणते, Whole numbers कोणते, Natural numbers कोणते, Negative numbers कोणते या सर्वांबद्दलची माहिती सविस्तरपणे उदाहरणांसहीत या प्रकरणामध्ये आपल्याला दिलेली आहे.

10) याचबरोबर विभाज्‍यतेच्‍या कसोट्या कशा वापराव्या याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या प्रकरणात दिलेली आहे.

11) दशांश संख्या, त्यांची बेरीज वजाबाकी कशी करावी, दोन अपूर्णांक दिलेली असतील त्यांचा छेद समान असेल तर त्यांना कसं Add किंवा Subtract करावं, छेद समान नसताना कशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी करावी याबद्दलची माहिती सुद्धा या प्रकरणामध्ये दिलेली आहे.

12) तसेच MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये आलेले आहेत ते सुद्धा सरावासाठी दिलेले आहेत, त्यांचं सरळ आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण या प्रकरणामध्ये दिलेलं आहे.




MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित - अंकगणितातील पायाभूत उदाहरणे




MPSC सराव प्रश्नपत्रिका 

विषय - अंकगणित - अंकगणितातील पायाभूत उदाहरणे  

टाईम : 60 मिनिटे 

मार्क्स : 30


सूचना :

  1. विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

  2. सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

  3. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

  4. या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

  5. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

  6. टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

  7. टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

  8. टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

  9. टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

  10. या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.


प्रश्नपत्रिका (Question Paper)

प्रश्न १. 106 या संख्येचा वर्ग किती?

(A) 11236

(B) 11216

(C) 10836

(D) 11336


प्रश्न २. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो, तिच्या वर्गाच्या शेवटचे दोन अंक नेहमी कोणते असतात?

(A) 25

(B) 15

(C) 75

(D) 35

 

प्रश्न ३. Square root 7396 चे मूल्य किती?

(A) 86

(B) 84

(C) 76

(D) 96

 

प्रश्न ४. Square root of [3]/175616 चे घनमूळ काढा.

(A) 56

(B) 46

(C) 66

(D) 54

 

प्रश्न ५. -119 + 72 + 228 - 333 + 124 चे उत्तर काय येईल?

(A) -28

(B) 28

(C) -38

(D) -18

 

प्रश्न ६. (-5) x (-4) x (-3) x 2 चा गुणाकार किती?

(A) -120

(B) 120

(C) -60

(D) 60








प्रश्न ७. खालीलपैकी कोणती संख्या 'अपरिमेय' (Irrational) आहे?

(A) Square root 21

(B) 12/5

(C) Square root 16

(D) 18

 

प्रश्न ८. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये '1' हा अंक किती वेळा येतो?

(A) 21

(B) 20

(C) 11

(D) 19

 

प्रश्न ९. 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान ५ अंकी संख्या कोणती?

(A) 10234

(B) 01234

(C) 12340

(D) 10432

 

प्रश्न १०. पहिल्या ५ नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती?

(A) 55

(B) 15

(C) 225

(D) 110

 

प्रश्न ११. ९ ची विभाज्यतेची कसोटी काय आहे?

(A) संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ९ ने भाग जाणे

(B) शेवटच्या दोन अंकांना ९ ने भाग जाणे

(C) एकक स्थानी ० किंवा ९ असणे

(D) संख्या सम असणे

 

प्रश्न १२. 1 ते 100 पर्यंत एकूण किती 'मूळ' (Prime) संख्या आहेत?

(A) 25

(B) 15

(C) 74

(D) 26

 

प्रश्न १३. 11/7 - 32/7 चे मूल्य किती?

(A) -3

(B) 3

(C) -4

(D) 4


प्रश्न १४. 23/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करा.

(A) 13/5

(B) 6/5

(C) 11/5

(D) 10/5


प्रश्न १५. 3/4 + 5/7 ची बेरीज किती?

(A) 41/28

(B) 8/11

(C) 15/28

(D) 21/20


प्रश्न १६. 16/15 x 3/4 चा गुणाकार संक्षिप्त रूपात लिहा.

(A) 4/5

(B) 48/60

(C) 3/5

(D) 1/5


प्रश्न १७. 8.17 + 3.4 ची बेरीज किती?

(A) 11.57

(B) 11.21

(C) 8.51

(D) 115.7


प्रश्न १८. 1.7 x 0.8 चे मूल्य किती?

(A) 1.36

(B) 13.6

(C) 0.136

(D) 1.46


प्रश्न १९. (0.11)^2 चे मूल्य किती?

(A) 0.0121

(B) 0.121

(C) 1.21

(D) 0.00121


प्रश्न २०. 72/0.08 चे उत्तर काय येईल?

(A) 900

(B) 90

(C) 9

(D) 0.9


प्रश्न २१. एखाद्या संख्येला 1000 ने भागले असता दशांश चिन्ह किती घरे डावीकडे सरकते?

(A) 3

(B) 2

(C) 1

(D) 0


प्रश्न २२. 13/21, 11/17, 9/13, 7/11 पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

(A) 13/21

(B) 11/17

(C) 9/13

(D) 7/11


प्रश्न २३. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस कोणती संख्या म्हणतात?

(A) त्रिकोणी संख्या

(B) चौरस संख्या

(C) मूळ संख्या

(D) सम संख्या


प्रश्न २४. ११ ची विभाज्यतेची कसोटी काय आहे?

(A) सम व विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक ० किंवा ११ च्या पटीत असणे

(B) शेवटचा अंक १ असणे

(C) सर्व अंकांची बेरीज ११ असणे

(D) संख्या ११ ने संपणे


प्रश्न २५. P x 11 + 33 या बेरजेला ९ ने नि:शेष भाग जातो, तर P ची सर्वात लहान किंमत काय?

(A) 6

(B) 1

(C) 3

(D) 9


प्रश्न २६. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये '0' हा अंक किती वेळा येतो?

(A) 11

(B) 10

(C) 21

(D) 9


प्रश्न २७. a + 1/b + 1/c चे सोपे रूप काय होईल?

(A) (abc + a + c) / (bc + 1)

(B) (abc + b + c) / (bc + 1)

(C) (a + b) / (b + c + 1)

(D) (abc + bc + 1) / (b + c + 1)


प्रश्न २८. 5/6 \div (1/2 + 1/3) चे उत्तर काय?

(A) 1

(B) 5/6

(C) 2

(D) 0


प्रश्न २९. Square root 0.5625 चे मूल्य किती?

(A) 0.75

(B) 0.075

(C) 7.5

(D) 0.85


प्रश्न ३०. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती असते?

(A) 2500

(B) 5050

(C) 2550

(D) 1250





                        इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.









No comments

Powered by Blogger.